४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद
अंबरनाथ – मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून लघु पाटबंधारे विभागाच्या अंबरनाथ तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या कुशिवली धरणामध्ये भूसंपादित भूमीचा मोबदला लाटणाऱ्या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चौघांनी वारशाचे बनावट कागदपत्र सिद्ध करून ४७ लाख २४ सहस्र ९४४ रुपयांची फसवणूक केली. नामा हाल्या पाटील, शंकर हाळ पाटील, नारायण नामा म्हात्रे आणि रामा धर्मा बांगर अशी त्यांची नावे आहेत.