मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचारी निलंबित !

धाडीमध्ये मुंब्रा पोलिसांनी ६ कोटी रुपये घेतल्याच्या तक्रारीचे प्रकरण

ठाणे, १२ मे (वार्ता.) – ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथील एका घरामध्ये टाकलेल्या धाडीत त्यांना तब्ब्ल ३० कोटी रुपयांची रक्कम आढळली होती. ३० कोटींपैकी ६ कोटी रुपये पोलिसांनीच घेतले, अशी माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसरित झाली होती. या प्रकरणी शेख इब्राहिम पाशा यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. यात खातेअंतर्गत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता. यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस नाईक अन् शिपाई अशा एकूण १० जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक रवि मदने, पोलीस उपनिरीक्षक हर्षल काळे, तसेच पोलीस नाईक पंकज गायकर, जगदीश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, तसेच पोलीस शिपाई ललित महाजन आणि नीलेश साळुंखे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणाचे अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून कठोर कारवाई करायला हवी !