कल्याण येथील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘मायटोकन’ आस्थापनाचा संचालक अटकेत !

ठाणे, १२ मे (वार्ता.) – कल्याण शहर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली. या योजनेतून ७ लाख ५८ सहस्र रुपये जमा झाल्यानंतर गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी ‘मायटोकन वॉलेट ट्रेडिंग’ आस्थापनाचा संचालक गौतम शामप्रसाद पांडे याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथून अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

संचालकांकडून फसवणुकीचे सर्व पैसे वसूल करून घ्यायला हवेत !