शिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच !’

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात ‘गोवा ही परशुरामभूमी कशी आहे’, हे सिद्ध केले आहे…

देशामध्ये निर्माण झालेल्या वीजटंचाईला कारणीभूत असणारे स्वार्थी राजकीय पक्ष !

१. तीव्र उन्हाळ्यात वीजटंचाई आणि कोळसा यांचे संकट निर्माण होणे सध्या भारतामध्ये तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे पंखे, कूलर, वातानुकूलीन यंत्रे यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. साहजिकच विजेची मागणीही प्रचंड वाढली आहे. विजेचा वापर अत्यधिक प्रमाणात असल्याने मे मास चालू झाला असतांनाच विजेची टंचाई भासू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये भारनियमन केले जात आहे. विजेची मागणी … Read more

गोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम !

मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढून सर्वस्वाचे बलीदान केलेले स्वातंत्र्यसैनिक यांचा अपमान करणे यापुढे थांबले पाहिजे.

आज ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

आता अधिक गतीने हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू कृतीशील होवोत, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

गोमंतकियांवर इन्क्विझिशन लादणारा फ्रान्सिस झेवियर !

ख्रिस्ती धर्माचा प्रसार गोव्यात करणे सुलभ व्हावे, म्हणून ‘इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)’ गोव्यात स्थापन केले आणि त्याद्वारे ख्रिस्ती धर्माेपदेशकांनी हिंदूंचा छळ करून धर्मांतर केले. त्यांपैकी फ्रान्सिस झेवियर हा जेझुईट धर्मोपदेशक ६ मे १५४२ या दिवशी गोव्यात पोचला.

आज अक्षय्य तृतीया !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.

सतत इतरांचा विचार करणाऱ्या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

आज वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘शिकण्याची प्रक्रिया, म्हणजे काय ?’, ते शिकता आले पाहिजे. ज्या शिकण्यामधून आपला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर सर्वांगीण विकास होऊन आपली वाटचाल चिरंतन आनंदाकडे होते, तेच खरे शिकणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव असलेले सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी (वय ७३ वर्षे) !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. विनायक शानभाग यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.