धुळे येथे ८९ तलवारी सापडल्याप्रकरणी चौघांना अटक !

पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळे येथे येणारी संशयास्पद चारचाकी गाडी दृष्टीस पडली. पोलिसांनी चारचाकीसह अनुमाने ७ लाख १३ सहस्र ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

गोव्यात प्रतिवर्षी १२ किशोरवयीन मुली गर्भवती होतात !

केवळ गर्भवती रहाणे आणि गर्भपाताच्या गोळ्या घेणे, या समस्यांवर उपाययोजना म्हणून लैंगिक शिक्षण देणे, हा त्यावरील पर्याय घातक ठरू शकतो. त्यामुळे ‘अल्पवयीन मुलींनी विवाहापूर्वी कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू नयेत’, यावरच उपाययोजना, म्हणजे मूळ कारणावरच उपाययोजना काढणे श्रेयस्कर आहे ! यासाठी मुलींना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे !

मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिटात ५० टक्के कपात ! – रावसाहेब दानवे

वातानुकूलित लोकलच्या तिकिटाच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. वातानुकूलित रेल्वेच्या तिकिटांच्या दरात किती कपात करावी ? याविषयी जनतेचे मत घेतले होते.

यवतमाळ जिल्हा परिषदेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईची चेतावणी !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अचानक दिलेल्या कार्यालयीन भेटीत अनेक विभागांमध्ये ३३ कर्मचारी विनाअनुमती अनुपस्थित आढळले.

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

आदर्श उद्योगरत्न !

८४ वर्षीय रतन टाटा यांच्यासारखा उत्साहाचा खळखळता झराच भारत देशाला लाभला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा निर्माण होणे विरळाच ! त्यांच्यासमोर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवे. देशाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवणारी रतन टाटा यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक भारतियाच्या मनात अजरामर राहील, हे निश्चित !

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्यक ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कायदा होऊन इतकी वर्षे लोटल्यानंतर कायद्याची प्रभावी कार्यवाही हवी, हे सांगायला लागते, हे दुर्दैवी ! कायद्याचे पालन का केले जात नाही ? याचा अभ्यास व्हायला हवा, तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई न करणार्‍यांना शिक्षा होणे अपेक्षित आहे.

राष्ट्रपुरुषांचे स्मारक आणि पुतळे यांची निगा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू ! – मुरलीधर मोहोळ, महापौर

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिना उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पाकीट चोरणारी महिला पोलिसांच्या कह्यात !

सराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ?

कोल्हापूर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस !

अचानक आलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची त्रेधा-तिरपिट उडाली.