कात्रज (पुणे) चौकातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

पुणे – कात्रज परिसराचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन २५ वर्षे झाली, तरी मूलभूत सुविधा आणि विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ट ३४ गावांची तीच अवस्था आहे. महापालिका प्रशासन आणि शासनकर्ते दुर्लक्ष करत असून न्याय मागण्यासाठी कात्रज चौक येथे १७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता; परंतु १९ एप्रिल या दिवशी पोलिसांनी उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांवर लाठीमार करत उपोषण उधळून लावले.

कात्रज चौकातून जवळच असलेल्या पंपिग स्टेशनकडे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जात असलेल्या या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले असून आता मागण्या मान्य झाल्याविना मागे न हटण्याचा निर्धार या वेळी कात्रज, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकांनी केल्याचे समजते.