हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २१ मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १४ ते १६ एप्रिल या कालावधीत २१ मंदिरांमध्ये सामूहिक साकडे घालण्यात आले.

देहली आणि नोएडा येथे विविध मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. देहली आणि नोएडा येथील सामूहिक प्रार्थनेच्या वेळी धर्मप्रेमींसह उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला.

२२ एप्रिलपासून एस्.टी. बस पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार !

नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

‘आय.एन्.एस्. वागशीर’ पाणबुडीचे जलावतरण !

या पाणबुडीत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही स्कॉर्पियन कलवरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नंदीपेट ग्राम येथील श्रीश्रीश्री मंगी रामुलु महाराज यांनी केले.

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.

अमरावती येथे भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

जिल्ह्यातील अचलपूर येथे झालेल्या दंगलीमागे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा हात असून त्याच या दंगलीच्या मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप येथील भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला होता.

भोंग्यांविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे.

समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी कृतीशील व्हा ! – सौ. कांचन शर्मा, हिंदु जनजागृती समिती

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेतात.

अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांच्यासह २७ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी !

अचलपूर येथील २ गटांतील दगडफेकीचे प्रकरण, अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी !