जम्मूमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !

मानवी अवयवांची तस्करी करणारी टोळी गोव्यात कार्यरत असल्याची शंका !

भाग्यनगरहून गोव्यात आल्यावर अपहरण करून घायाळ केल्याविषयी एका वाहनचालकाची पोलिसांकडे तक्रार

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी !

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांनी ८ एप्रिल या दिवशी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. या प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आक्रमण हे पोलीस यंत्रणेचे अपयश ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

राजकारणात राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत. एकूणच या सर्व प्रकरणाचे अन्वेषण व्हायला हवे, पोलिसांचेही अन्वेषण व्हायला हवे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या काही मालमत्ता आर्थिक घोटाळ्यातील पैशांतून खरेदी केलेल्या आहेत ! – अंमलबजावणी संचालनालय

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नुकत्याच कह्यात घेतलेल्या मालमत्ता या आर्थिक घोटाळ्यातून जमवलेल्या काळ्या पैशांतून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने प्रवीण राऊत यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर सर्वसामान्यांना जेवायला लागत आहे रस्त्यावर !

सरकारकडून आमदारांना अत्यल्प; मात्र सर्वसामान्यांना अधिक दरात भोजन !

वैद्यकीय अभ्यासक्रमास (एम्.बी.बी.एस्.) प्रवेश देतो म्हणून १३ जणांची फसवणूक !

अशा प्रकारे अवैधरित्या वैद्यकीय आणि अन्य अभ्यासक्रम यांमध्ये प्रवेश मिळवून देणार्‍यांचे जाळे असण्याची शक्यता आहे. ते शोधून नष्ट करणे आवश्यक आहे.

उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेनंतरही पोलिसांकडून प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांवर कारवाई नाही !

न्यायालयाचा अवमान करणार्‍या प्रशासनावर न्यायालयाने कठोर कारवाई केली, तरच यापुढे न्यायालयाचा अवमान करण्यास कुणी धजावणार नाही !

संभाजीनगर येथे पोलिसांकडून तलवार घेऊन फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला ‘जुना मोंढा भागात कल्पतरू ट्रेडर्ससमोर शेख हा तलवार घेऊन फिरत असून तो दहशत निर्माण करत आहे’, अशी माहिती माहीतगाराकडून मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी येऊन त्याला पकडले.