राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आक्रमण हे पोलीस यंत्रणेचे अपयश ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेले आक्रमण हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. माध्यमांना या घटनेची माहिती होती; मात्र पोलिसांना हे कळू शकत नाही, हे आश्चर्यकारक आहे. राजकारणात राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत. एकूणच या सर्व प्रकरणाचे अन्वेषण व्हायला हवे, पोलिसांचेही अन्वेषण व्हायला हवे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.