संभाजीनगर येथे पोलिसांकडून तलवार घेऊन फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येत्या काही दिवसांत येणार्‍या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी दप्तरावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगार पडताळणी करण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये अवैध मद्यविक्री यांसह इतर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. जिन्सी पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने तलवार घेऊन फिरणारा शेख कैफ शेख इसार (वय १९ वर्षे) याला पकडले आहे. मोंढा भागात ६ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला ‘जुना मोंढा भागात कल्पतरू ट्रेडर्ससमोर शेख हा तलवार घेऊन फिरत असून तो दहशत निर्माण करत आहे’, अशी माहिती माहीतगाराकडून मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळी येऊन त्याला पकडले. यासमवेत पोलिसांनी शहरात १४ ठिकाणी धाडी टाकून मद्याची अवैध विक्री करणार्‍यांना पकडले. मिसारवाडी, जवाहरनगर, वेदांतनगर, पुंडलिकनगर, वाळूज, सातारा परिसर, औद्योगिक वसाहत यांसह इतर ठिकाणी धाडी टाकून १४ जणांना मद्याची विक्री करतांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.