‘पेस’ या युरोपीय देशांच्या परिषदेतून रशियाची हकालपट्टी !

‘पेस’ म्हणजे ‘पार्लियामेंट्री असेंब्ली ऑफ द कॉन्सिल ऑफ युरोप’ (युरोपीय परिषदेची संसदीय विधानसभा) या युरोपीय संघटनेने रशियाची हाकालपट्टी केली आहे. ‘रशियन टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार २१९ सदस्यांपैकी २१६ जणांनी रशियाच्या विरोधात मत दिले.

अमरावती येथे मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करण्याचा संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांचा निश्चय !

अमरावती जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा नुकताच पार पडला. यामध्ये विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

पुणे येथे शाळा संचालक आणि बाउन्सर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे नीलम गोर्‍हे यांचे निर्देश !

पुणे येथे एका खासगी शाळेत शुल्क भरण्यावरून पालकास बाउन्सरकडून मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

दहशतवाद्यांशी लढतांना बार्शी येथील सैनिक रामेश्वर काकडे यांना वीरमरण !

रामेश्वर काकडे हे बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी आहेत. ते सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे तैनात होते. ३ दिवसांपूर्वीच येथे दहशतवाद्यांसमवेत त्यांची चकमक झाली.

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या १०० व्या ‘ई-बूक’चा लोकार्पण सोहळा !

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैलीतील १०० व्या ‘ई-बूक’चा लोकार्पण सोहळा २० मार्च या दिवशी सायं. ५ ते रात्री ८ या वेळेत पुणे येथील मनोहर बँक्वेट हॉल, मेहेंदळे गॅरेज, एरंडवणे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील ५ राष्ट्रीयीकृत बँकांतील १२ प्रकरणांत १३ सहस्र २५७ कोटी रुपयांचा अपव्यहार आणि फसवणूक !

अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे.

मुंबईतील १४ सहस्र स्वच्छता कामगारांना येत्या २ वर्षांत प्रत्येकी ३९९ चौ.मी. घर देणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये एकूण २९ सहस्र ८१६ स्वच्छता कामगार आहेत. त्यांपैकी ५ सहस्र ५९२ कामगारांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे १० वर्षांचे दायित्व ठेकेदाराचे असणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले काळे पालट मागे घेण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाचे राज्यपालांना १ लाख विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन सुपूर्द !

महाराष्ट्र सरकारने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे पालट करत विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला.

७ वर्षांत कल्याण-डोंबिवली येथील ११ सहस्र ४४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होईपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही ? याविषयी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी !

भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास धरा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री शक्तीच्या रूपाने कार्यरत असते.