आध्यात्मिक उपाय आणि शारिरीक त्रास

‘एखाद्याला होणारा त्रास हा पूर्णतः शारीरिक स्तरावरील असल्यास यामध्ये केवळ आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी लाभ होण्यास पुष्कळ कालावधी लागू शकतो. होणारा त्रास आध्यात्मिक कि शारीरिक आहे, हे कळत नसल्यास आध्यात्मिक उपाय आणि वैद्यकीय उपचार दोन्ही सारखेच चालू ठेवावेत.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांची गुणवैशिष्ट्ये

सुश्री (कु.) सुनीता यांच्यामध्ये साधनेमुळे झालेले पालट आणि त्या आनंदी असल्याचे पाहून आई-वडिलांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय पालटला. सुश्री (कु.) सुनीता यांच्यासाठी ही एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती होती.

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. अशोक पात्रीकर यांनी कोणताही संकोच न बाळगता ‘त्यांचे साधनेत येण्यापूर्वीचे जीवन कसे होते’, हे या लेखात दिले आहे. तेव्हा त्यांची असलेली नकारात्मक वैशिष्ट्ये वाचून ‘अशी व्यक्ती पुढे ‘संत’ होऊ शकते’, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण त्यांनी ते खरे करून दाखवले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

स्वतःच्या समस्यांविषयी विचार करत रहाण्याने, तसेच त्यांविषयी इतरांना सतत सांगितल्याने मनाला नकारात्मक स्वयंसूचना दिल्याप्रमाणे होते.