स्टॅसबोर्ग (फ्रान्स) – रशियाकडून युक्रेनवर गेल्या ३ आठवड्यांपासून आक्रमण चालू आहे. त्यास विरोध दर्शवण्यासाठी ‘पेस’ म्हणजे ‘पार्लियामेंट्री असेंब्ली ऑफ द कॉन्सिल ऑफ युरोप’ (युरोपीय परिषदेची संसदीय विधानसभा) या युरोपीय संघटनेने रशियाची हाकालपट्टी केली आहे. ‘रशियन टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार २१९ सदस्यांपैकी २१६ जणांनी रशियाच्या विरोधात मत दिले. एकूण ४७ देश हे ‘पेस’चे सदस्य असून त्यात रशियाचाही समावेश होता.