बार्शी – येथील रामेश्वर काकडे या सैनिकाला दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आले आहे. पुणे आकाशवाणी केंद्राने १७ मार्च या दिवशी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्वीट करत ही माहिती दिली आहे. रामेश्वर काकडे हे बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील रहिवासी आहेत. ते सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे तैनात होते. ३ दिवसांपूर्वीच येथे दहशतवाद्यांसमवेत त्यांची चकमक झाली. या वेळी त्यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.