पुणे – विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैलीतील १०० व्या ‘ई-बूक’चा लोकार्पण सोहळा २० मार्च या दिवशी सायं. ५ ते रात्री ८ या वेळेत पुणे येथील मनोहर बँक्वेट हॉल, मेहेंदळे गॅरेज, एरंडवणे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष अतिथी म्हणून (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले, (निवृत्त) ले. जनरल राजेंद्र निभोरकर, श्री. चंद्रकांत दादा शेवाळे, (निवृत्त) ब्रिगेडियर महाजन आणि चितळेबाबा उपस्थित रहाणार आहेत. ‘हजारोंच्या सेनेचे संचलन कसे होत असे ?’, ‘लढा पावनखिंडीतला’, ‘ऑटोरायटिंग कसे दिसते ?’, ‘कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म’, ‘नाडी ग्रंथ भविष्य’, ‘श्रीपाद श्रीवल्लभ पोथी’, ‘नेताजींच्या सहवासात’, ‘हवाईदलातील किस्से’ इत्यादी ‘ई-बूक’ आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत.