स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या तालिबान्यांकडून महिलादिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

तालिबानी आतंकवादी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी देशातील अनेक महिला खेळाडू, तसेच महिला पत्रकार आणि निवेदक यांना ठार मारले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी तालिबानी अशा प्रकारच्या शुभेच्छा देत आहेत, हे लक्षात घ्या !

‘वेब सिरीज’च्या संदर्भात ‘सायबर क्राईम’कडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई होईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य

पोलीस प्रशासन ‘कुणी तक्रार प्रविष्ट करेल मग आम्ही कारवाई करू’, अशी भूमिका का घेत आहे ? असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे गुन्हा करण्यास दिलेली सवलतच आहे !

बनावट बियाणे देणार्‍या पंचगंगा सिड्स आस्थापनाचा परवाना निलंबित ! – कृषीमंत्री दादा भुसे यांची घोषणा

स्थानिक कृषी अधिकार्‍यांनी मे. पंचगंगा सिड्स प्रा.लि. या आस्थापनातील बनावट बियाण्यांची माहिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा जिल्हा कृषी अधिकारी दिलीप झेंडे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

वनहक्क भूमी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन !

सरकारने वनहक्क भूमी कायद्याची अंमलबजावणी करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ७ मार्च या दिवशी आंदोलन केले.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी अधिवक्ते यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले होते.

विरुद्ध दिशेने वाहने चालवणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद करा ! – संजय पांडे, पोलीस आयुक्त

याविषयी कायद्यात तरतूद असतांनाही असे आदेश देण्याची वेळ का आली, याच्या मुळापर्यंत जाऊन समस्या सोडवणे अपेक्षित आहे !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा लवकरच कारागृहात जाणार ! – संजय राऊत, शिवसेना

किरीट सोमय्या यांनी पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान यांना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांच्याकडून नील सोमय्या यांच्या आस्थापनाला भूमी मिळवून दिली होती का ?, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकरच सोमय्या पिता-पुत्र कारागृहात जाणार आहेत

अनेक नामांकित आस्थापनांचे मध अल्प दर्जाचे आणि भेसळयुक्त असल्याची अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांची विधान परिषदेत स्वीकृती !

भेसळयुक्त मधाची निर्मिती करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करण्याविषयी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला डॉ. शिंगणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील स्वीकृती दिली.

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी खंडणी वसूल करत आहेत ! – संजय राऊत, शिवसेना, खासदार

अंमलबजावणी संचालनालयाचे मोठे अधिकारी भाजपचे ए.टी.एम्. मशीन बनले असून काही अधिकारी खंडणी वसूल करत आहेत, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचारामुळे ऊर्जाखाते डबघाईला ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘महापारेषणला वर्ष २०१७-१८ मध्ये ८१५ कोटी, वर्ष २०१८-१९ मध्ये ७४५ कोटी, वर्ष २०१९ मध्ये ४९४ कोटी रुपये नफा होता.