स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या तालिबान्यांकडून महिलादिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

  • महिलांवर अत्याचार करून त्यांचे आयुष्य नरकासमान करणार्‍या तालिबानने अशा शुभेच्छा देणे, हा मोठा विनोदच म्हणावा लागेल ! – संपादक 
  • तालिबानी आतंकवादी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी देशातील अनेक महिला खेळाडू, तसेच महिला पत्रकार आणि निवेदक यांना ठार मारले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी तालिबानी अशा प्रकारच्या शुभेच्छा देत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक 

काबुल – जगभर ८ मार्च या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय महिलादिन’ साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबान या आतंकवाद्यांच्या सरकारने अफगाणी महिलांना आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

तालिबान सरकारच्या परराष्ट्रीय मंत्रालयाचा प्रवक्ता अब्दुल कहर बाल्की याने ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. ‘हा दिवस महिलांसाठी शुभ जावो. अफगाणिस्तानमध्ये झालेले प्रदीर्घ युद्ध महिलांसाठी हानीकारक ठरले. महिलांच्या या दुर्दशेकडे लक्ष देऊन त्यांना सुविधा प्रदान करण्यात आम्ही वचनबद्ध आहोत’, असे ट्वीट त्याने केले आहे.