मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – अनेक नामांकित आस्थापनांचे मध अल्प दर्जाचे आणि भेसळयुक्त असल्याची स्वीकृती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. भेसळयुक्त मधाची निर्मिती करणार्या आस्थापनांवर कारवाई करण्याविषयी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला डॉ. शिंगणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील स्वीकृती दिली.
डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील विविध आस्थापनाच्या मधाचे ९७ नमुन्यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आली. यांतील केवळ ३९ नमुने प्रमाणित होते. ५३ नमुने अल्प दर्जाचे, १ असुरक्षित असल्याचे आढळले. ४ नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. या प्रकरणात ५२ आस्थापनांनी न्यायालयात अर्ज केला असल्याचे या वेळी डॉ. शिंगणे यांनी सांगितले.