|

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून तिच्या सख्या भावांनी मासूमपूर येथील ‘मोनू’ या ट्रकचालक हिंदु युवकाची गळा घोटून हत्या केली आहे. हे प्रकरण दोन धर्मांतील असल्याने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाशी संबंधित काही युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर त्यांना सोडून दिले होते. त्यामुळे गावकर्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. (याउलट आरोपी जर हिंदु असता, तर एव्हाना पोलिसांनी तात्काळ अटक केली असती. अशा पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी. यातून पोलिसांचे धर्मांधांविषयीचे तुष्टीकरणच दिसून येते ! – संपादक) त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या नसीम आणि त्याचा भाऊ वसीम या दोन सख्या भावांना अटक केली.
१. मृतकाचा भाऊ मोंटी याने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ गावातीलच एका मुसलमान युवतीशी प्रेम करत होता. यासंदर्भात जेव्हा युवतीच्या भावांना समजले, तेव्हा त्यांनी मोनूला ठार मारण्याची धमकी दिली होती. सकाळी मोनू शौचालयासाठी जंगलात गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा दुसर्या दिवशीच गावाबाहेरील एका शेतात मृतदेह मिळाला होता.
२. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित