पुणे – पदभरतीतील निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अपकीर्ती प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकले आहे. हा निर्णय शासनाच्या कार्यासन अधिकारी अदिती लेंभे यांनी घोषित केला आहे. ‘म्हाडा’ परीक्षा घोटाळा एम्.पी.एस्.सी. समन्वय समितीने उघड केल्यापासून या आस्थापनाला काळ्या सूचीमध्ये टाकण्याची मागणी सातत्याने होत होती.