रशियामध्ये लहान मुलांवर बलात्कार करणार्‍यांना उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक येथील कारागृहात ठेवणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशियामध्ये लहान मुलांवर होणार्‍या वाढत्या बलात्कारांची नोंद घेत सरकारने कठोर कायदा बनवण्याची घोषणा केली आहे. यात दोषींना उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक या निर्मनुष्य भागामध्ये कारागृह बांधून ठेवण्यात येणार आहे. या कायद्याला पुढील मासामध्ये संसदेमध्ये संमती मिळण्याची शक्यता आहे. आर्क्टिक येथे गोठवणारी थंडी असून तेथे उणे तापमान असते.