गुरुग्राममधील हिंदु व्यक्तीच्या समाधीची भूमी कब्रस्तान दाखवून मशीद बांधण्याचा होता डाव !
|
गुरुग्राम (हरियाणा) – येथील हिंदूंची मालकी असलेले समाधी स्थळ कब्रस्तान असल्याचे सांगून तेथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार महंमद अदीब यांच्यासह अब्दुल हसीब कासमी आणि मुफ्ती महंमद सलीम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘याद्वारे धार्मिक तणाव निर्माण करण्याचे षड्यंत्र होते’, असे पोलिसांनी म्हटले आहे.
येथील झाडसा गावातील एका हिंदु परिवाराची ही भूमी आहे आणि त्यांनी त्यांच्या एका मृत वृद्ध व्यक्तीची समाधी बनवली होती. येथे अनेक काळ कुणीच येत नसल्याचे पाहून महंमद आदीब यांनी याला कब्रस्तान दाखवून मशीद बनवण्याचा प्रयत्न चालू केला होता. पोलिसांकडून आता त्यांच्याकडे कागदपत्रे मागण्यात आली आहेत.
Dinesh Thakur, convener, Jai Bharat Mata Vahini, has alleged that former MP Mohammad Adeeb and the other accused were planning to build a mosque by encroaching land in Gurgaon’s sector 40 and trying to incite a riot.@pub_neat reportshttps://t.co/wC75zcRjNc
— Express Delhi-NCR 😷 (@ieDelhi) January 6, 2022