कोल्हापूर, १ जानेवारी (वार्ता.) – गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी नंतर श्री जोतिबा देव आणि नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शनही घेतले.
१ जानेवारीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी !
१ जानेवारी आणि २ जानेवारी अशा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहे, तरीही दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह आढळून आला.