व्यसनाधिनता टाळण्यासाठी ‘दारू नको दूध प्या’ ! – राजू यादव, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख

नागरिकांना दूध वाटप करतांना बाजूला थांबलेले करवीर शिवसेनेचे कार्यकर्ते  १. राजू यादव, तसेच अन्य

उंचगाव (कोल्हापूर), १ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री अनेक युवक मद्यपान करून भरधाव वाहने चालवत असल्याने अपघात होतात. यामुळे देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी युवक-समाज यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने ‘दारू नको दूध प्या !’, असे आवाहन करत शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने ३१ डिसेंबरच्या रात्री उंचगाव कमान येथे ‘दारू नको दूध प्या !’ हा उपक्रम राबवण्यात आला.

उपस्थित नागरिकांना हिंदु जनजागृती समितीची हस्तपत्रके वितरित करतांना श्री. राजू यादव (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

या वेळी युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, उपतालुकाप्रमुख श्री. विक्रम चौगुले, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे श्री. महादेव चव्हाण, युवासेनेचे श्री. सचिन नागटिळक, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे यांसह अन्य उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिद्ध करण्यात आलेली ३१ डिसेंबरच्या निमित्ताने नागरिकांचे प्रबोधन करणारी हस्तपत्रके वितरित करण्यात आली.