अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पाठवलेल्या यानाचे सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श !

नासाच्या #ParkerSolarProbe ने पहिल्यांदाच सूर्याला स्पर्श केला, वातावरणात डुबकी मारली !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने तिच्या मानवरहित अवकाश यानाने सूर्याला प्रथमच ‘स्पर्श’ केल्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वारे दिली आहे. हे यान वर्ष २०१८ मध्ये अंतराळात पाठवण्यात आले आहे.

‘पार्कर सोलार प्रोब’

नासाने म्हटले आहे की, इतिहासात प्रथमच अंतराळ यानाने सूर्याच्या प्रभामंडळात (‘कोरोना’मध्ये) प्रवेश केला आहे. प्रवेश केला तो बिंदू सूर्याच्या वातावरणाचा असून तेथे सूर्याचे लोहचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण तीव्र असते. सूर्य ज्यापासून बनला, त्या गोष्टीला स्पर्श केल्यामुळे वैज्ञानिकांना आपल्याजवळ असलेल्या तार्‍याची अतिशय महत्त्वाची आणि सूर्यमालेवर तिच्या प्रभावाची माहिती उपलब्ध होण्यास साहाय्य होईल. ‘पार्कर सोलार प्रोब’ हे यान आधीच सूर्याजवळ १० वेळा गेले आहे आणि पुढील ४ वर्षे माहिती गोळा करण्यासाठी पार्कर त्याच्या आणखी जवळ जाणार आहे.