केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार असल्यावर हिंदूंच्या आणि हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. भविष्यात या हत्या होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तेथील हिंदुत्वनिष्ठांच्या रक्षणाचा प्रयत्न करावा, असे हिंदूंना वाटते ! – संपादक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांना ४ अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घडली. या हत्येसाठी भाजपने ‘सोशल डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया’ या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या राजकीय पक्षाला उत्तरदायी ठरवले आहे. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत.
Kerala: RSS worker hacked to death in Palakkad, state BJP president calls attack ‘planned’ https://t.co/ZdpsaYMWHb
— Republic (@republic) November 15, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीत त्यांच्या पत्नीसह मोटर सायकलवरून सकाळी ९ वाजता कामाला निघाले होते. रस्त्याने जात असतांना एका चारचाकी वाहनाने त्यांना ‘ओव्हरटेक’ करत त्यांच्या मोटर सायकलसमोर वाहन थांबवले. त्यानंतर चारचाकीमध्ये असलेले चारही जण बाहेर आले. त्यांनी संजीत यांना मोटर सायकलवरून खाली पाडले. त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यास चालू केले. या वेळी त्यांची पत्नी संचित यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती रस्त्याने ये-जा करणार्यांकडे साहाय्याची मागणी करत होती; मात्र तिला कुणीही साहाय्य केले नाही. संजीत मारहाणीमध्ये बेशुद्ध पडल्यावर मारेकरी पळून गेले.