गलवान खोर्‍यातील संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाचे छायाचित्र प्रसारित करणार्‍याला ७ मासांची कारावासाची शिक्षा

चिनी सैनिकांच्या स्मारकाचे छायाचित्र

बीजिंग (चीन) – गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यातील संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे ४५ हून अधिक सैनिक ठार झाले होते; मात्र चीनने अधिकृतरित्या त्याच्या सैनिकांचा मृत्यू झाल्याचे नाकारले होते. तरीही गोपनीय माहितीनुसार चीनने मृत झालेल्या सैनिकांचे एक स्मारक उभारल्याचे समोर आले होते. या स्मारकांच्या आणि त्यांच्या दफन केलेल्या ठिकाणाची छायाचित्रे एका व्यक्तीने सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या प्रकरणी त्या व्यक्तीला ७ मासांच्या कारावासाची शिक्षा चीनच्या झिंजियांगमधील स्थानिक न्यायालयाने सुनावली.