अ.भा.वि.प.कडून हनुमान चालीसाचे पठण
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांधांकडून असे प्रकार होणारच ! – संपादक
जयपूर (राजस्थान) – येथील राजस्थान महाविद्यालयात १२ नोव्हेंबरला काही मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी या विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यापासून रोखले होते. या वेळी काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना ‘एन्.एस्.यू.आय.’च्या काही विद्यार्थ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की, मुसलमान विद्यार्थ्यांना मैदानात नमाजपठण करू दिले जावे अन्यथा त्यांना त्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी. दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अ.भा.वि.प.ने) यास विरोध दर्शवत महाविद्यालयात हनुमान चालीसाचे पठण केले. यामुळे सध्या महाविद्यालयामध्ये तणावाची स्थिती आहे.
राजस्थान कॉलेज में नमाज के विरोध में किया गया हनुमान चालीसा का पाठ
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat 👉: https://t.co/ogFsKf9YX1#RajasthanCollege #Namaz #HanumanChalisa #TimesNowNavbharatOriginal pic.twitter.com/lwXY4xd5tp
— Times Now Navbharat (@TNNavbharat) November 15, 2021
१. एन्.एस्.यू.आय.चे म्हणणे आहे की, नमाजपठण करण्यापासून रोखणारे शिक्षक आणि सुरक्षारक्षक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. एन्.एस्.यू.आय.चे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी म्हणाले की, येथे प्रत्येक धर्माचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात; पण संघाशी संबंधित असलेल्या शिक्षकाने विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांनाच त्रास दिला. हे आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत धार्मिक सलोखा बिघडवणारा शिक्षक आणि सुरक्षारक्षक यांना कामावरून काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही विरोध करत राहू.
२. अ.भा.वि.प.चे प्रदेशमंत्री हुशियार मीना म्हणाले की, महाविद्यालयीन परिसरात काही समाजकंटकांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अशांवर कायदेशीर कारवाई केली गेली नाही, तर अभाविप संपूर्ण राज्यात आंदोलन करील.