देहलीत २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करायची का ? – सर्वोच्च न्यायालय

देहलीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे ? याविषयी सरकारने एक आपत्कालीन धोरण सिद्ध करावे. देहलीत २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करायची का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.

हबीबगंज (भोपाळ) येथील रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ यांचे नाव देेणार

येथील हबीबगंज रेल्वे स्थानक नव्या रूपामध्ये सिद्ध झाले आहे. याचे उद्घाटन १५ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ नाव देण्यात येणार आहे.

देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांनी वाहनांचा वापर ३० टक्के न्यून करावा ! – केंद्रीय प्रदूषण मंडळाचा सल्ला

देहलीत वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी न्यून करण्याचा सल्ला दिला आहे.

चित्रपटांतील मुसलमानांची दाखवण्यात येणारी नकारात्मक प्रतिमा पालटण्याचा अमेरिकेतील एका गटाचा प्रयत्न

जिहादी आतंकवादी, गुन्हेगारी आदींमध्ये सर्वांत आघाडीवर कोण आहेत, हे जगाला ठाऊक आहे आणि तेच जर चित्रपटामध्ये दाखवण्यात येत असेल, तर त्याला नकारात्मक कसे म्हणता येईल ?

काँग्रेसचे विनायक देशमुख यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

असा सल्ला काँग्रेसवाल्यांना द्यावा लागणे लज्जास्पद ! पक्षाशी नव्हे, तर नेत्यांशी एकनिष्ठ रहाणारे कधी व्यापकपणे राष्ट्राचा विचार करतील, ही आशाच नको ! काँग्रेसचे नेतेही ‘पक्ष सर्वश्रेष्ठ’ असल्याचे कार्यकर्त्यांना सांगतात, राष्ट्र नव्हे, हे जाणा !

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम

देशाच्या गृहमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका करणार्‍या आणि ३७ दिवस कारागृहात रहाणार्‍या अशा व्यक्तींच्या कार्यक्रमांवर गोवा शासनाने बंदी घालावी, ही अपेक्षा !

गोवा बाल न्यायालयाने अजामीनपात्र ‘वॉरंट’ काढल्यावर ‘आप’च्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो न्यायालयात उपस्थित !

लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याचे प्रकरण

बंगालमध्ये दुर्गापूजा मंडपांवर आक्रमण करून दहशत माजवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

राष्ट्रीय बजरंग दल (गोवा)ची राज्यपालांकडे मागणी

माडखोल येथील तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह २ दिवसांनी सापडला

अर्जुन आणि त्याचे मित्र माडखोल धरणात तिघेही अंघोळीसाठी उतरले. अर्जुनला पोहता येत नसल्याने थोड्या वेळाने तो दिसेनासा झाला.स्थानिकांच्या साहाय्याने पोलिसांनी अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १२ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह तरंगतांना दिसला.

हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ गटाने केले दहन

नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.