लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याचे प्रकरण
वॉरंट निघेपर्यंत न्यायालयाला दाद न देणार्या ‘आप’च्या नेत्यांचा उद्दामपणा जाणा ! असे नेते कधी कायद्याचे रक्षण करतील का ? – संपादक
पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याच्या प्रकरणी सुनावणीला अनुपस्थित रहात असल्याने गोवा बाल न्यायालयाने ‘आप’च्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात १२ नोव्हेंबर या दिवशी अजाामीनपात्र आदेश (वॉरंट) काढला. यानंतर प्रतिमा कुतिन्हो न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर हा आदेश रहित करण्यात आला.
लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याच्या प्रकरणी नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि बाल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी चालू आहे. प्रतिमा कुतिन्हो सुनावणीस अनुपस्थित रहात नसल्याने बाल न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र आदेश (वॉरंट) काढला आणि त्यांना कह्यात घेण्याचे निर्देश दिले. प्रतिमा कुतिन्हो यांना १२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २.३० वाजता न्यायालयात उपस्थित करावे, असे आदेशात स्पष्ट म्हटले होते. तत्पूर्वी प्रतिमा कुतिन्हो या त्यांच्या अधिवक्त्यांच्या मार्फत न्यायालयात उपस्थित झाल्या. त्यानंतर पत्रकारांना प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, ‘‘न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. (असे म्हणायचे आणि न्यायालयावर अजाामीनपात्र वॉरंट काढायची पाळी आणायची याला काय अर्थ आहे ? – संपादक) माझ्या विरोधातील गुन्हा राजकीय सूडापोटी करण्यात आला आहे.’’ (लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक करू नये, असा कायदा आहे. प्रतिमा कुतिन्हो यांना हा कायदा ठाऊक नसेल, तर त्यांनी निदान चूक स्वीकारून क्षमा मागायला हवी होती. तेही न करता त्याला राजकारणाचा रंग देणे, हे अतीच झाले ! – संपादक)