पक्ष सर्वश्रेष्ठ असल्याने पक्षासाठी काम करा, नेत्यांचे अनुयायी होऊ नका !
|
कुडाळ – पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पक्षासाठी काम करा, कोणत्याही कार्यकर्त्याने नेत्यांचे अनुयायी होऊ नये; कारण नेते पक्ष पालटू शकतात आणि त्यांच्यासमवेत कार्यकर्तेही जातात. असे करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक विनायक देशमुख यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा दौर्यावर आलेल्या देशमुख यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी अध्यक्ष विकास सावंत आदी उपस्थित होते.
या वेळी देशमुख म्हणाले, ‘‘केंद्र सरकारमुळे जी महागाई वाढली आहे, त्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांत जाऊन जनजागृती करणार आहे. महागाईच्या माध्यमातून केंद्र सरकार जो कर वसूल करत आहे, त्या करातून सवलती देत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सवलती ते स्वत: देत असल्याचे सांगत आहेत. जनतेची चाललेली ही दिशाभूल उघड करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.’’