
सावंतवाडी – तालुक्यातील माडखोल धरणात १० नोव्हेंबर या दिवशी बुडालेल्या शहरातील खासकीलवाडा येथील अर्जुन विश्राम पाताडे (वय १८ वर्षे) या युवकाचा मृतदेह १२ नोव्हेंबर या दिवशी सापडला. याची माहिती माडखोल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी पोलिसांना दिली.
(सौजन्य : Inside Marathi)
अर्जुन आणि त्याचे मित्र तेजस राऊळ अन् संकेत कामतेकर १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता माडखोल धरण परिसरात फिरायला गेले होते. दुपारी तिघेही अंघोळीसाठी धरणात उतरले. अर्जुनला पोहता येत नसल्याने थोड्या वेळाने तो दिसेनासा झाला. मित्रांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याची माहिती दिली आणि अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो न सापडल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिकांच्या साहाय्याने पोलिसांनी अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १२ नोव्हेंबरला सकाळी अर्जुन याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला.
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी