परमबीर सिंह देशाबाहेर गेल्याविषयीची निश्चित माहिती नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ते देशाच्या बाहेर गेले असल्याविषयीची कोणतीही निश्चित माहिती आम्हाला मिळालेली नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘परमबीर सिंह यांना आम्ही शोधत आहोत. आम्ही जाणूनबुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही. जे नियमाला धरून असेल, तेच होईल. आमचे अधिकारी केंद्रशासनाशी समन्वय साधून आहेत.’’