नाशिक येथील धर्मांध आतिफ याला चौकशीसाठी देहलीत नेले !

  • उत्तरप्रदेशातील धर्मांतराचे प्रकरण

  • आतिफ याच्या कुटुंबियांचीही चौकशी !

आतिफ

नाशिक – उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील धर्मांतराच्या प्रकरणी कुणाल चौधरी उपाख्य आतिफ या धर्मांधाची चौकशी करण्यासाठी त्याला देहलीत नेण्यात आले. उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने २६ सप्टेंबर या दिवशी आतिफ याला येथील खोले मळा परिसरातील एका घरातून कह्यात घेतले होते. या पथकाने महंमद इद्रिस आणि महंमद सलीम या धर्मांधांना अटक केल्यानंतर आतिफ याचे नाव समोर आले होते.

या प्रकरणी आतिफ याच्या कुटुंबियांची स्थानिक पोलिसांनी घरी जाऊन सखोल चौकशी केली. पोलीस उपायुक्त विजय खरात आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी त्याच्या वडिलांना उपनगर पोलीस ठाण्यात नेऊन तेथे त्यांची २ घंटे चौकशी केली. याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

आतिफ याचे वडील हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्याचा लहान भाऊ अभियंता आहे, तर आई गृहिणी आहे. सध्या त्याचे वडील नाशिक रस्ता येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. ‘आतिफ याने रशियामध्ये विदेशातील मुलीशी प्रेमविवाह केला आहे’, अशी चर्चा आहे. तो कुणामध्ये अधिक मिसळत नव्हता. त्याचे रहाणीमान उच्च दर्जाचे होते. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत तो भ्रमणभाषवर बोलत असायचा, असेही सांगण्यात आले.