दिवसभरात ३६ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३६ नवीन रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४०८ झाली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ५८७ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र ३० रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेले, सध्या उपचार चालू असलेले आणि कोरोनामुक्त झालेले, अशा रुग्णांची एकूण संख्या ५२ सहस्र २७ झाली आहे.