वणी (यवतमाळ), २० ऑक्टोबर (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’ तर्गत आमदार संजीवभाऊ बोदकुरवार यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी त्यांनी विषय समजून घेऊन ७० सहस्र रुपयांच्या ग्रंथांची मागणी केली. ‘सनातन पंचांग २०२२’ स्वीकारतांना ‘मतदारसंघातील वाचनालये ग्रंथसंपदेने समृद्ध व्हावीत’, असे त्यांनी म्हटले.