देवगड – मत्स्यव्यवसाय विभागाने १९ ऑक्टोबरला सकाळी महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राच्या नियमांचा भंग करून अवैधपणे मासेमारी करणार्या मलपी, कर्नाटक येथील २ नौकांना पकडले. गेल्या एक मासात मत्स्यव्यवसाय विभागाने केलेली ही तिसरी कारवाई आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक १९ ऑक्टोबरला समुद्रात गस्त घालत होते. या वेळी देवगड दीपगृहाच्या समोरील समुद्रात १५ सागरी मैल अंतरावर अवैधरित्या मासेमारी करणार्या मलपी, कर्नाटक येथील २ नौकांना पथकाने पकडले. या नौकांना देवगड बंदरात आणले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी रुद्र मालवणकर यांनी दिली.