तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाला सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन तोंड देणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही संयुक्त राष्ट्र गप्प आहे. तो काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प होता. संयुक्त राष्ट्र हा विश्वाच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहे.

शासकीय संस्थांना देण्यात येणारी ५० टक्के रकमेची सवलत रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे येथील महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय संस्थांना पुनर्स्थापना दरामध्ये देण्यात येणारी ५० टक्के रकमेची सवलत रहित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे.

सर्वांना आपलेसे करणारे कै. बंकटलाल मोदी आणि तीव्र तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी !

राजस्थान येथे प्रसाराच्या सेवेनिमित्त गेल्यावर श्री. आनंद जाखोटिया यांना मोदी कुटुंबियांसह रहाण्याची संधी मिळाल्याने त्यांच्याशी ओळख झाली. कै. बंकटलाल मोदी आणि त्यांची पत्नी पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातन संस्थेच्या ६३ व्या समष्टी संत) (वय ७१ वर्षे) यांची जी गुणवैशिष्ट्ये लक्षात आली, ती येथे दिली आहेत.

प्रेमळ, मनमिळाऊ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले कै. बंकटलाल मोदी !

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक श्री. बंकटलाल मोदी (बाबूजी) (वय ७५ वर्षे) यांच्याविषयी त्यांची नात कु. अनन्या शैलेश मोदी (वय १९ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) हिच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती निलिमा नाईक यांना जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !

सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सहनशील, सेवेची तळमळ असणारे आणि सनातन संस्थेप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जोधपूर (राजस्थान) येथील कै. बंकटलाल मोदी (वय ७५ वर्षे) !

‘जोधपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक श्री. बंकटलाल मोदी (वय ७५ वर्षे) यांचे २२.७.२०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध (१८.१०.२०२१) या दिवशी आहे. त्या निमित्ताने त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नी पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांना त्यांच्या यजमानांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना कु. रूपाली कुलकर्णी यांच्याकडे पाहून जाणवलेली सूत्रे

सनातन आश्रमातील साधिका कु. रूपाली कुलकर्णी हिला पाहिल्यावर सौ. योया वाले (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) ह्यांना तिच्यात चांगला पालट झाल्याचे जाणवले.

उत्साही, आनंदी आणि साधनेची तीव्र तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील सौ. शोभा शंकर माटकर (वय ५२ वर्षे) !

‘काकू व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देतात. त्या स्वभावदोष निर्मूलन सत्संग आणि भावसत्संग यांसाठी त्यांच्या गावातून ६ कि.मी. एवढे अंतर चालून तुळजापूरला जातात.’ – कु. दीपाली मतकर

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा अजित तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.