१. उत्साही आणि आनंदी
‘सौ. शोभा माटकरकाकू सतत उत्साही आणि आनंदी असतात.’ – श्री. विनोद रसाळ आणि श्रीमती अलका व्हनमारे
२. इतरांना साहाय्य करणे
‘गावात कुणाला काही अडचण असल्यास काकू त्यांना लगेच साहाय्य करतात.’ – कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)
३. साधनेची तळमळ
अ. ‘काकू पहाटे ४ वाजता उठून ४ ते ६ या वेळेत नामजप करतात.’ – श्री. विनोद रसाळ आणि श्रीमती अलका व्हनमारे
आ. ‘काकू व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देतात. त्या स्वभावदोष निर्मूलन सत्संग आणि भावसत्संग यांसाठी त्यांच्या गावातून ६ कि.मी. एवढे अंतर चालून तुळजापूरला जातात.’
– कु. दीपाली मतकर
४. सेवेची तळमळ
अ. ‘त्या नियमित सेवा करतात. त्या गावातील सर्वांना साधना सांगतात.’ – श्री. विनोद रसाळ आणि श्रीमती अलका व्हनमारे
आ. ‘गुरुपौर्णिमेच्या वेळी गावात प्रसार करण्याची सेवा काकू एकट्याच करतात. ‘माझ्यासमवेत कुणी नाही. मी एकटी कशी सेवा करू ?’, असा विचार न करता त्या पुष्कळ उत्साहाने आणि आनंदाने सेवा करतात.
५. काकू सतत भावाच्या स्थितीत असतात.’
– कु. दीपाली मतकर
(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.१.२०२०)