प्रेमळ, मनमिळाऊ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले कै. बंकटलाल मोदी !

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक श्री. बंकटलाल मोदी (बाबूजी) (वय ७५ वर्षे) यांच्याविषयी त्यांची नात कु. अनन्या शैलेश मोदी (वय १९ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) हिच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. बंकटलाल मोदी

१. प्रेमभाव

कु. अनन्या मोदी

अ. ‘रामनाथी (गोवा) किंवा देवद (पनवेल, रायगड) येथील सनातनच्या आश्रमात जायचे ठरले किंवा कुणी साधक आश्रमात जात असतील, तर तेथील साधकांसाठी राजस्थानच्या कोणत्या नवीन वस्तू पाठवायच्या ?’, याची सिद्धता ते स्वतःहून करायचे.

आ. प्रसारसेवेच्या निमित्ताने कुणी साधक घरी आल्यास बाजारातून मिठाई आणि फळे आणून ते वेळोवेळी सर्वांना द्यायचे. त्यांना काही भाज्या स्वतः बनवण्याची आवड होती. ते भाज्या बनवून साधकांना खायला द्यायचे.

२. परिस्थिती स्वीकारणे

काही वेळेला सेवेच्या निमित्ताने पत्नी (पू. (श्रीमती) सुशीला मोदी, सनातनच्या ६३ व्या समष्टी संत) आणि सुना (सौ. राखी शैलेश मोदी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के अन् सौ. स्वाती शीतल मोदी) बाहेर जायच्या; पण त्याविषयी त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. त्यांना यायला उशीर झाला किंवा जेवण वेळेत मिळाले नाही, तरीही ते परिस्थिती स्वीकारायचे.

३. नवीन गोष्टी स्वीकारून स्वतःत पालट करणे आणि प्रत्येक कृती निःस्वार्थपणे करणे

वेळ आणि काळ यांनुसार त्यांनी स्वतःमध्ये पालट केले आणि नवीन गोष्टी स्वीकारल्या. इतके करूनही त्यांनी कधीही कोणाकडूनही अपेक्षा केली नाही. ते निःस्वार्थपणे प्रत्येक कृती करायचे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ते नामजपादी उपाय ईश्वराची आज्ञा मानून बिनचूक करायचे आणि वेळोवेळी सांगितलेला नामजप ते श्रद्धेने परिपूर्ण करायचे. मृत्यूसमयीही त्यांच्या मुखी श्री गुरूंचे नाव होते.’

– कु. अनन्या शैलेश मोदी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (वय १९ वर्षे)(नात, मुलाची मुलगी), जोधपूर, राजस्थान. (२१.९.२०२१)