तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाला सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन तोंड देणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही संयुक्त राष्ट्र गप्प आहे. तो काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प होता. संयुक्त राष्ट्र हा विश्वाच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बनावटी (खोट्या) चेहर्‍याचा आपल्या देशासह अन्य कोणत्याही देशाला आवश्यकता नाही, अशी स्थिती येत्या ३-४ वर्षांत निर्माण होईल. आज भारतात अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ (छोटी पाकिस्तान) निर्माण झाल्यामुळे हिंदूंना प्रतिदिन पलायन करावे लागत आहे. या परिस्थितीत तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाला आता सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन तोंड द्यायला हवे.