६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा अजित तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सौ. अरुणा तावडे

१. बालपणातील आठवणी 

अ. ‘अरुणाच्या जन्माआधी मी पुष्कळ कर्मकांड करत होते. मी मंगळवारी आणि शुक्रवारी अंबामातेच्या मंदिरात जायचे. तेथील प्रसाद आणि तीर्थ घरी घेऊन यायचे. मी देवीच्या समवेत बोलत असे आणि संकट आल्यावर तिला आठवून शरण जात असे. अरुणाच्या जन्माच्या वेळी माझी शस्त्रक्रिया होणार होती. तेव्हा मी देवीच्या देवळात जाऊन तिला आळवले, ‘आई मला वाचव.’ त्या वेळी माझी शस्त्रक्रिया न होता तिचा जन्म झाला. आधुनिक वैद्यांनाही याचे आश्चर्य वाटले.

सौ. शोभा कौलकर

आ. अरुणाच्या बाबांना मुलगा हवा होता. मला मुलगी झाल्यामुळे मी थोडी घाबरले होते. तिच्या वडिलांनी तिला पाहिलेही नाही. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी आणि घरातील सर्वांनी तिच्या बाबांची समजूत घातली. त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितले, ‘‘आई (माझ्या सासूबाई १ मासापूर्वी वारल्या होत्या.) परत जन्माला आली आहे.’’ तेव्हा ते शांत झाले. नंतर अरुणा त्यांची लाडकी झाली.

इ. लहानपणी ती तिची सर्व चुलत भावंडे आणि तिची काकू यांची सर्व कामे व्यवस्थित करायची. त्या वेळी तिला वेळेचे भान नसायचे. ती कपडे आणि भांडी स्वच्छ अन् व्यवस्थित धूत असे.’

– सौ. शोभा कौलकर (वय ६२ वर्षे) (सौ. अरुणाची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. शांत आणि मनमिळाऊ स्वभाव 

अ. ‘सौ. अरुणा लहानपणापासून शांत स्वभावाची आहे. आमची परिस्थिती बेताची होती, तरी सचिन (मुलगा) आणि अरुणा हिचे शिक्षण ‘बी.कॉम.’पर्यंत झाले. मी १० वर्षे चाकरीसाठी बाहेरगावी होतो. तेव्हा अरुणाने कधीच कसला हट्ट केला नाही.

आ. अरुणाचा स्वभाव मनमिळाऊ होता. तिची शाळा आणि महाविद्यालय यांमधील तिच्या सर्व मैत्रिणी बुद्धीमान होत्या. अरुणाला सायकल इत्यादी चालवता येत नसल्याने त्या तिला दुचाकीवरून महाविद्यालयात न्यायच्या आणि घरी आणून सोडायच्या. ती सर्वांना साहाय्य करायची; म्हणून ती मैत्रिणींना हवीहवीशी वाटायची. अजूनही त्या तिची आठवण काढतात.

इ. ती मिरज आश्रमात असतांनाही सर्वांशी मोकळेपणाने बोलत असे.’

श्री. पांडुरंग कौलकर

– श्री. पांडुरंग कौलकर ((वय ७२ वर्षे)(सौ. अरुणाचे बाबा, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ई. ‘सोनाली खटावकर आणि अरुणा अगदी जिवा-भावाच्या मैत्रिणी होत्या. गेल्या दोन पिढ्यांपासून आमच्या दोन्ही कुटुंबांचे जाणे-येणे आणि सण साजरे करणे एकत्र होते. आम्ही साधनेत आल्यावर त्या दोघी एकत्र दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यास जात असत. त्यांची मैत्री अजूनही चांगली टिकून आहे.

३. आईचे पाहून स्वयंपाक करण्यास शिकणे

मी प्रसाराला गेले की, ती स्वयंपाक करून ठेवत असे. एकदा तिने पुरणपोळ्याही छान बनवल्या होत्या. मी घरातील कामे करत असतांना ती माझे निरीक्षण करत असे. असे सर्व पाहूनच ती स्वयंपाक करायला शिकली.’

– सौ. शोभा कौलकर

४. विवाहानंतर

अ. आमच्या दोघांच्या ध्यानी-मनी नसतांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेने अरुणाचे लग्न ठरले. ‘ते दोघे (सौ. अरुणा आणि श्री. अजित तावडे) आनंदात आहेत’, हे पाहून आम्हाला फार आनंद होतो.’ – श्री. पांडुरंग कौलकर

आ. ‘तिच्या लग्नानंतर मला ‘ती सासरी कशी राहील ?’, याची चिंता वाटत होती; पण तिने सासरी सर्वांची मने जिंकली आहेत.’ – सौ. शोभा कौलकर

५. ‘ती सतत आनंदी राहून सेवा करते. ती प्रत्येक सेवा परिपूर्ण करते. त्याकडे पुन्हा बघावे लागत नाही.’

– श्री. पांडुरंग कौलकर आणि सौ. शोभा कौलकर

६. प्रार्थना

तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर आम्हाला पुष्कळ आनंद झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तिची पुढील प्रगती करवून घ्यावी’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’ – श्री. पांडुरंग कौलकर आणि सौ. शोभा कौलकर

(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २.८.२०२०)