राजस्थान येथे प्रसाराच्या सेवेनिमित्त गेल्यावर श्री. आनंद जाखोटिया यांना मोदी कुटुंबियांसह रहाण्याची संधी मिळाल्याने त्यांच्याशी ओळख झाली. कै. बंकटलाल मोदी आणि त्यांची पत्नी पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातन संस्थेच्या ६३ व्या समष्टी संत) (वय ७१ वर्षे) यांची जी गुणवैशिष्ट्ये लक्षात आली, ती येथे दिली आहेत.
कै. बंकटलाल मोदी
१. सर्वांना आपलेसे करणे
‘ते पहिल्या भेटीत लोकांना आपलेसे करून घ्यायचे. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला कधीच संकोच वाटला नाही.
२. प्रेमळ स्वभाव
कै. बाबूजी अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते. घरातील सर्वांनी सेवा करावी, यासाठी त्यांचे सहकार्य असायचे. धर्मप्रसारासाठी राजस्थानमध्ये गेलेल्या पूर्णवेळ साधकांना त्यांच्या घरी सेवाकेंद्राप्रमाणेच वाटायचे. सर्व साधकांचे प्रेमाने आदरातिथ्य करायचे. घरातील कुणाच्या चुकीवर त्यांचे रागावणेही प्रेमाने असायचे. त्यामुळे कुणीही न दुखावता झालेली चूक सुधारायचे.’
पू. (श्रीमती) सुशीला मोदी (कै. बंकटलाल मोदी यांच्या पत्नी)
१. ‘यजमानांच्या निधनाच्या १२ व्या दिवशीही त्याकडे साक्षीभावाने पाहून आलेल्या नातेवाइकांना सत्संग मिळावा’, यासाठी तीव्र तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी !
‘बाबूजींच्या निधनानंतर अनेक नातेवाईक भेटायला येत होते. ११ व्या किंवा १२ व्या दिवशी जे नातेवाईक आले, त्यांचाही पूज्य भाभी यांनी सत्संग घेतला. त्यांना संस्थेच्या काही ध्वनीचित्र-चकत्या दाखवून पू. भाभींनी त्यांना नामजप आणि साधना यांचे महत्त्व सांगितले. ‘यातून प्रत्येक क्षण सेवेत जावा आणि लोकांचा वेळही भूतकाळातील घटनांमध्ये न रहाता त्यांना काहीतरी सत्संग मिळावा’, ही पू. मोदीभाभी यांची तळमळ शिकायला मिळाली.
२. १२ व्या दिवशी आलेल्या सर्वांना त्यांनी सनातन संस्थेचा ‘धर्मशिक्षण फलक’, हा ग्रंथ भेट देऊन अध्यात्मप्रसारही केला.’
– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान. (२१.९.२०२१)