‘काही आठवड्यांपूर्वी मी आश्रमातील साधिका कु. रूपाली कुलकर्णी हिला पाहिल्यावर मला तिच्यात चांगला पालट झाल्याचे जाणवले.
१. तिच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवत होता. वास्तविक तिला पुष्कळ शारीरिक त्रास आहेत, तरीही मी जेव्हा जेव्हा तिला पहाते, तेव्हा ती नेहमीच आनंदी आणि हसतमुख असते.
२. तिच्या हातांना सूज असूनही ती सेवा अतिशय भावपूर्ण आणि आनंदाने करते.
३. तिच्यामध्ये मला प्रेमभाव, तळमळ, स्थिरता, स्वीकारण्याची वृत्ती आणि सेवाभाव जाणवला.
४. ‘तिची अध्यात्मात प्रगती होत आहे’, असे मला जाणवले.
५. ती पूर्वीच्या तुलनेत वेगळी दिसत असल्याने मी तिला ‘साधनेत तू काय प्रयत्न करत आहेस ?’, असे विचारले. त्यावर तिने ‘मी एका संतांच्या समवेत सेवा करत असल्याने हा पालट जाणवत आहे’, असे अतिशय भावपूर्ण उत्तर दिले. ‘ती आनंदी का दिसत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.’
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) (२४.१२.२०२०)