भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने १६ ऑक्टोबरला विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ! – गोवर्धन हसबनीस, भाजप सांस्कृतिक आघाडी 

भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने दळणवळण बंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच गणेशोत्सव काळात गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

४ मास वेतन न मिळाल्याने सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील १७ वैद्यकीय अधिकार्‍यांचे त्यागपत्र !

कोरोना महामारीच्या काळात काम केलेले वैद्यकीय अधिकारी दुर्लक्षित. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही म्हण सार्थ करणारे प्रशासन. वैद्यकीय अधिकार्‍यांवर त्यागपत्र देण्याची पाळी येणे प्रशासनासाठी लज्जास्पद.

वैभववाडी येथे ए.टी.एम्. मध्ये भरण्यासाठी आणलेले २३ लाख रुपये लुटण्याचा डाव आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनीच रचल्याचे उघड !

बँक ऑफ इंडियाच्या येथील ‘ए.टी.एम्.’मध्ये रक्कम भरण्यासाठी येत असलेल्या आस्थापनाच्या कर्मचार्‍यांना लुटण्यात आल्याची घटना घडली होती; पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात उपरोक्त आस्थापनाच्या २ कर्मचार्‍यांनीच हा डाव रचल्याचे उघड झाले आहे. 

आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडून देण्यात युवकांचे साहाय्य !

दौंड तालुक्यातील पारगाव येथील युवकांनी आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडून देण्यास पोलिसांना साहाय्य केले आहे; मात्र यवत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केला.

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

कॉमिला (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंडपाची नासधूस करण्यास आली. कुराणाचा अवमान केल्याची अफवा पसरवून हे आक्रमण करण्यात आले.

बांग्लादेश में धर्मांधों ने श्री दुर्गादेवी के पूजा पंडाल पर आक्रमण कर मूर्तियां तोडीं !

भारत सरकार इसपर ध्यान दे !

हिंदूंनो, प्रत्येक दिवस हा विजयदिनच व्हायला हवा !

सध्याची राष्ट्राची स्थिती पहाता याच सीमोल्लंघनाची आज आवश्यकता आहे. हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे उभे रहाणे आणि ते आघात दूर करणे, हे खरे सीमोल्लंघन !

विजयादशमीविषयी संत आणि सद्गुरु यांचे अमूल्य विचार !

‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’

आजचा वाढदिवस : कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे.

आश्विन शुक्ल पक्ष दशमी (विजयादशमी, १५.१०.२०२१) या दिवशी रायपूर (छत्तीसगड) येथील कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देण्याचे महत्त्व !

‘दसर्‍याच्या दिवशी समस्त हिंदू एकमेकांना आपट्याची पाने देऊन स्नेहसंबंध दृढ करतात.