विजयादशमी महोत्सव का साजरा करतात ?
‘आश्विन शुक्ल पक्ष दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स फक्त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजन नेतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २००७)
‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’
– परात्पर गुरु पांडे महाराज
‘साधकाच्या जीवनातील खर्या अर्थाने विजयादशमी किंवा दसरा साजरा होणे, म्हणजे मोक्षप्राप्ती करून घेणे होय.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हे आदिशक्ती, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !
‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींना ठेचण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जसा तू त्यांना आशीर्वाद दिलास, तसे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हालाही आशीर्वादाचे बळ दे !!!’
– (पू.) श्री. संदीप आळशी (२३.८.२०१७)