दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देण्याचे महत्त्व !

‘दसर्‍याच्या दिवशी समस्त हिंदू एकमेकांना आपट्याची पाने देऊन स्नेहसंबंध दृढ करतात.

पू. अशोक पात्रीकर

 

१. आपट्याच्या पानाची रचना

आपट्याच्या पानाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्याचे दोन भाग एकमेकांना जोडले आहेत. हे पान दोन भागांत सहज विभागता येते. आपट्याच्या पानाची घडीही तशीच होते.

२. दसर्‍याला एकमेकांना आपट्याची पाने देण्याच्या कृतीतील भावार्थ !

अ. याचा भावार्थ असा आहे की, दोन व्यक्ती एकमेकांना भेटत आहेत. त्यांच्यात प्रेम आणि सद्भावना निर्माण होत आहे. आपट्याच्या पानाच्या दोन भागांवरील शिरा स्पष्ट दिसतात.

आ. अशा लक्षावधी पानांनी लगडलेला आपट्याचा वृक्ष हा प्रतीकात्मकरित्या हिंदूंचा एक मोठा समूह आहे. हिंदू या वृक्षाप्रमाणे संघटित झाले, तर त्यांच्याकडे कुणीही वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही. आपट्याची पाने एकमेकांना देऊन आपण दसरा हा सण आनंदाने साजरा करूया आणि हिंदूंचे संघटन करूया.’

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर (६.१०.२०१९)