नागपूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रहित !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजनही मर्यादित लोकांमध्ये होणार !

दीक्षाभूमी

नागपूर – येथे दसर्‍याच्या दिवशी दोन मोठे आणि महत्त्वाचे सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसाठी ‘दीक्षाभूमी सोहळा’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसर्‍याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे केले जाणार आहेत. संघाच्या शस्त्रपूजनाला कोणताही प्रमुख पाहुणा नसेल, तर दीक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. लोकाग्रहास्तव दीक्षाभूमी स्तुपात दर्शन घेता येणार आहे. या दर्शनासाठी १८ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील लोकांना प्रवेश नाही. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल.