तपश्‍चर्येचा अग्नी !

‘तपश्‍चर्येचा अग्नी पेटवायला पूर्वी गारगोटी लागत असे. तत्पूर्वी मंत्राने अग्नी पेटत असे. तत्पूर्वी प्रार्थना करावी लागे.’

श्रद्धा १०० टक्केच हवी !

‘श्रद्धेमध्ये १०० टक्केची स्थिरता हलवू नका. मग ती १०१ पण नको आणि ९९ पण नको. १०१ म्हणजे फाजील श्रद्धा. ती खाली घसरते. ९९ टक्के म्हणजे अपूर्ण श्रद्धा.’

तपश्‍चर्या ही काही गादीवर बसून होत नसते, तर अडचणींशी लढा देऊनच होते !

‘तपश्‍चर्या ही काही गादीवर बसून होत नसते, तर अडचणींशी लढा देऊनच होते. अडचणी नसतील, तर परीक्षा नसते आणि परीक्षाच नसली, तर तपाचे प्रमाणपत्र मिळणार कुठून ?’

अतिथी देवो भव ।

‘आपल्याकडे आलेला अतिथी हा आपल्या अशुद्ध मनाला शुद्धत्व प्राप्त करून देत असतो; म्हणून या अतिथीला आपले वंदन असो.’

परमेश्‍वरच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्यावे !

‘आपण सेवाधर्म म्हटला, भगवंताची सेवा म्हटली की, कितीही जबाबदारीचे डोक्यावर वजन असले, तरी ते बाजूला उतरवून ‘परमेश्‍वरच्या सेवेकडे धावणे’, हीच परमेश्‍वराच्या परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.’