‘भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालेच, तर भारताचा पराभव निश्‍चित !’ – चीनच्या सरकारी दैनिकाची दर्पोक्ती

रावणामध्येही असाच अहंकार होता आणि मग त्याचा नाश झाला. चीनचाही हा अहंकार भारताने लवकरात लवकर आक्रमक भूमिका घेऊन नष्ट करण्याची आवश्यकता आहे. चीन एक वायू भरलेला फुगा असून त्याला टाचणी लावण्याचे काम भारतानेच केले पाहिजे ! – संपादक

बीजिंग (चीन) – भारताने एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की, ज्या पद्धतीने त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचे आहे, ते प्रत्यक्षात शक्य नाही. (चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक) जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच, तर भारताने पराभवासाठी निश्‍चित स्वरूपात सिद्ध रहावे, अशी दर्पोक्ती चीनचे सरकारी दैनिक ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपदकीय लेखात करण्यात आली आहे.

‘भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद अजूनही कायम आहे. त्यास भारताकडून संवादात घेतली जाणारी चुकीची भूमिका कारणीभूत आहे. (‘एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे सैन्याद्वारे घुसखोरी करायची, अशीच चीनची नेहमीची भूमिका आहे. त्यात त्याने पालट केला नाही, तर परिणाम भोगायला सिद्ध व्हावे’, अशी चेतवणी भारताने चीनला दिली पाहिजे ! – संपादक) भारताच्या मागण्या वास्तविक पातळीवर अव्यवहार्य आहेत’, असेही या लेखात म्हटले आहे.